breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘बीव्हीजी’ कंपनी आयकर विभागाच्या रडारवर, पिंपरीतील कार्यालयावर धाड

पिंपरी |महाईन्यूज

पुण्यासह देशभरात हाऊस किपिंग व आरोग्य सेवा क्षेत्रातील नामवंत कंपनी असलेल्या ‘भारत विकास ग्रुप’वर (बिव्हीजी) आज बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापे टाकण्यात आल्याचे समजते आहे.

पिंपरी चिंचवडमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. सकाळी दहा वाजता याठिकाणी प्राप्तिकर विभागाचे 30-40 अधिकारी, कर्मचारी आले. त्यांनी कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले. कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर सोडलेले नाही. सर्वांचे मोबाईल काढून घेतले असून, कार्यालयातील दूरध्वनीही बंद केले आहेत.

दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गावरील कार्यालयासमोर बघ्यांची गर्दी झाली आहे. कंपनीच्या दिल्ली व मुंबई येथील कार्यालयावरही छापे टाकण्यात आल्याचेही समजते आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button