breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘फ्लोटिग वॉटर ड्रोन’ द्वारे पवना, इंद्रायणी नदीतील निर्माल्य काढणार

महापाैर, आयुक्तांनी समोर घेतली चाचणी

महापालिका पर्यावरण विभागाचा स्तुत्य उपक्रम 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  गणेश विसर्जन करताना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकले जाते. त्यासह नदीतील तरंगते इतर साहित्य काढण्यासाठी फ्लोटिग वॉटर ड्रोन वापरण्यात येत आहे. विसर्जनादरम्यान प्रायोगिक तत्वावार त्याचा वापर होणार असून सोमवारी (दि.17) चिंचवड येथील पवना नदी विसर्जन घाटावर या ड्रोनची चाचणी घेण्यात आली. 

या ड्रोनच्या सहाय्याने नदीच्या पाण्यावरील तरंगत्या वस्तू म्हणजेच प्लॅस्टिक, फुले, निर्माल्य, वनस्पती, थर्माकोल इ. काढून नदी स्वच्छ केली जावू शकते. त्यासाठी कोणत्याही कर्मचा-याला किंवा नागरिकाला पाण्यात उतरण्याची आवश्यकता नाही. मशीन  बॅटरी ऑपरेटेड असून रिमोट कंट्रोलव्दारे हे मशीन नियंत्रित होते. या मशीनचे वजन अंदाजे 40 किलो असून एकावेळी 350 किलो कचरा त्याव्दारे नदीतून काढला जातो.

या ड्रोनची चाचणी महापौर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी संजय खोत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. गणेश विसर्जनादरम्यान प्रायोगिक तत्वावर ड्रोनचा वापर होणार आहे. राज्य शासनाकडून या ड्रोन बनविणा-या उद्योजजकाला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आयुक्तांनी त्याची माहिती घेतल्यानंतर चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे.  दरम्यान, गणेश विसर्जन काळात पवना नदीवरील घाटावर 17 ते 20 आणि इंद्रायणी नदीच्या घाटावर 19 व 20 सप्टेंबर असे प्लोटिंग वाॅटर ड्रोन ठेवले जाणार आहे.

गणशे विसर्जनादरम्यान पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पुजा साहित्य, हार, फुले, पिशव्या हे साहित्य टाकले जातात. ते काढण्यासाठी प्रायोगिक तत्वावर या उपक्रमाची चाचणी घेतली जात आहे. 

-संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button