Breaking-newsपिंपरी / चिंचवड

फ्रान्सच्या शिष्ट मंडळाची महापालिकेस भेट

पिंपरी – फ्रान्स येथील औद्योगिक शिष्ट मंडळाने पिंपरी – चिंचवड शहराच्या औद्योगिक क्षेत्राशी संबंधित, तसेच स्मार्ट सिटी संदर्भात तांत्रिक क्षेत्रात मदत करण्यासाठी व विविध माहितीची देवाण-घेवाण होण्यासाठी महापालिकेला भेट देऊन माहिती घेतली.

महापौर नितीन काळजे यांनी शिष्ट मंडळाचे स्वागत केले. सभागृह नेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, नगरसदस्या सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, फ्रान्सचे दूत जीन मार्क फेनेट, आर्थिक सल्लागार जीन मार्क मिग्नोन, सल्लागार बाह्य संबंध आणि कायदेशीर बाबी, प्रादेशिक आर्थिक सेवा, फ्रान्समधील दुतावास इलिका खन्ना आदी उपस्थित होते. या शिष्ट मंडळास पॅन सिटीबाबत सादरीकरण करण्यात आले. महापालिकेच्या विकास प्रकल्पांचे शिष्ट मंडळाने कौतुक केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button