Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी घेतला कोविड 19 लसीचा डोस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/cp-Krishnaprakash.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रामध्ये अधिकृत नोंदणीकृत आरोग्य सेवा कर्मचा-यांना कोविड 19 प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला.
महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथील दवाखान्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील फ्रंट लाईन कर्मचा-यांना आज मंगळवारी (दि. 9) कोविड 19 लस देण्यात आली. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी प्रथम लस टोचून घेतली. त्यानंतर अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना क्रमाक्रमाने लस टोचण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल जॉन, डॉ. मुलशंकर शर्मा, डॉ. अभिजित सांगडे, पीएचएन प्रियंका सर्वज्ञ आदी यावेळी उपस्थित होते.