पोलिस आयुक्तालयात एक उपायुक्त अन् दोन सहायक आयुक्तांची नियुक्ती
![Appointment of 5 new police inspectors in Pimpri Chinchwad, internal transfer of two](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/0Pimpri_Chinchwad_Police_PCPC_0.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड पोलिस दलात एक उपायुक्त, दोन नवीन सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी उशिरा गृह विभागाने काढले.
उपमहानिरीक्षक, उपायुक्त, सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयांच्या गृह विभागाने बुधवारी बदल्या केल्या. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी नाशिक येथील पोलिस अकादमीचे अधीक्षक आनंद भोईटे यांची नियुक्ती केली आहे. सोलापूर लोहमार्गचे सहायक पोलिस आयुक्त नंदकिशोर भोसले-पाटील व राज्य गुप्तवार्ता विभाग, पुण्याचे अपर पोलिस उपायुक्त नंदकिशोर पिंजण यांची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात सहायक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक आयुक्त अश्विनी राख यांची पुण्यातील एमआयए अपर पोलिस अधिक्षकपदी, तर रामचंद्र जाधव यांची जालना येथील पोलिस प्रशिक्षण विद्यालयात उपअधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे