breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पैशासाठी सासरी होणा-या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – नवीन फ्लॅट आमि गाडी घेण्यासाठी सासरकडून पैसे आणत नाही म्हणून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पती, सासू-सासरे अशा तीन जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दिलीप मनोहर दिक्षीत (वय 57, रा. मु. पो. पसुरे, ता. भोर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वरुप ज्ञानेश्वर क्षीरसागर (वय 34), पदमा ज्ञानेश्वर क्षीरसागर (वय 60) आणि ज्ञानेश्वर गोविंद क्षीरसागर (वय 65, सर्व रा. स्वरगंगा हाऊसिंग सोसायटी, बिल्डींग नंबर 1/602, वल्लभनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी स्नेहा सासरकडून फ्लॅट घेण्यासाठी तसेच गाडी घेण्यासाठी पैसे आणत नाही, बाळंतपणाचा खर्च आणत नाही, म्हणून तिचा शारिरीक छळ करत होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक छळ केल्याने तिने राहत्या घरात फॅनला ओढणीच्या सहायाने रविवारी (दि. 2) दुपारी चारच्या सुमारास गळफास घेतला. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button