Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्या पुणे दौरा
मुंबई – विरोधकांकडून वारंवार होणारी टीका आणि पुण्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर पुणे दौरा ठरवला असून ते उद्या गुरुवारी पुण्याला जाणार आहेत. केंद्रीय पथकानेही मध्यंतरी पुण्यात पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला होता.
राज्यातील तीन कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुण्याचा एक रुग्ण होता. इतकी गंभीर परिस्थिती पुण्याची आहे. मुंबईत कोरोना आटोक्यात येत असताना पुण्यात निर्माण झालेली ही परिस्थिती आणि शरद पवार यांनी केलेली सूचना व भाजपच्या नेत्यांनी केलेली टीका यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्याचा पुणे दौरा ठरवला, अशी चर्चा आहे.





