Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
पुण्यात पुन्हा भिंत कोसळली, सहा मजुरांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/20190702_085329.jpg)
पुणे ‐ कोंढवा येथील संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाचा आता पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगावातील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तर सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे.
जखमींना भारती रूग्णालयात दाखल केले आहे. झाड पडून संरक्षक भिंत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे पथकही दाखल झाले आहे.