breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यातील संचेती रुग्णालयावर कारवाई करा, आमदार लक्ष्मण जगताप यांची मागणी

 – पुण्यातील संचेती रुग्णालय गरीब रुग्णांना मोफत उपचार नाकारते

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – पुणे, शिवाजीनगर येथील संचेती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे शासनाच्या जागेत उभे असल्याने धर्मादाय रुग्णालय आहे. हाडांच्या आजारांवर सर्व प्रकारचे उपचारांसाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. धर्मादाय रुग्णालय असल्याने या रुग्णालयात आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत उपचार करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अनेकदा प्रशासनारडून हे रुग्णालय धर्मादाय नसल्याचे सांगत गोरगरीब रुग्णांना उपचार नाकारले जातात. त्यामुळे अशा रुग्णांची ससेहोलपट होत असून, सरकारची सुद्धा फसवणूक सुरू आहे. त्यामुळे या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी धर्मादाय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शिवाजीनगर येथील संचेती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णालयात हाडांच्या आजारांवर सर्व प्रकारचे उपचार केले जातात. त्यासाठी हे रुग्णालय प्रसिद्ध असल्याने राज्यभरातील गरजू रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. शासनाची जागा घेतल्याने हे हॉस्पिटल धर्मादाय रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयात गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत उपचार तसेच अशा रुग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, रुग्णालय व्यवस्थापनांकडून गरीबांच्या या कायद्याची सर्रासपणे पायमल्ली सुरू आहे.

या रुग्णालयाची जुनी इमारत अपुरी पडत असल्याने शेजारीच नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या रुग्णालयात आलेल्या गोरगरीब उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तेथील डॉक्टरांच्याकडून उपचार खर्चाच तपशील नवीन इमारतीतील दिला जातो. संबंधित रुग्ण तेथे उपचारासाठी गेल्यानंतर त्याठिकाणी अशा रुग्णांना मार्गदर्शनासाठी बसवण्यात आलेल्या समाजविकास अधिकाऱ्यांची टिम रुग्णांना चुकीची माहिती देतात. हे रुग्णालय धर्मदाय रुग्णालय नसल्याचे सांगत मोफत उपचार होणार नसल्याचे गरीब रुग्णांना सांगितले जाते. उपचाराचा संपूर्ण खर्च भारावा लागेल, असेही रुग्णांना सांगितले जाते. त्यामुळे अनेक रुग्ण विना उपचाराचे निघून जातात. जे रुग्ण उपचारासाठी तयार होतात, त्यांची अक्षरशः लूट केली जाते.

सरकारने गोरगरीब गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्याच्या अटीवर या रुग्णालयांसाठी जागा दिलेली आहे. परंतु, या रुग्णालयाचे व्यवस्थापन ही अट पाळत नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णसेवेखाली होणारा हा चुकीचा कारभार लाजिरवाणा आहे. गरीब रुग्णांना उपचारांपासून वंचित ठेवणे निंदनीय आहे. त्यामुळे संचेती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या या कारभाराची आपण स्वतःहून दखल घ्यावी. या रुग्णालयाने आतापर्यंत गरीब रुग्णांना नाकारलेल्या उपचाराची संपूर्ण माहिती गोळा करावी. तसेच या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. जेणेकरून यापुढे रुग्णालयात येणारा एकही गरीब व गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button