Breaking-newsपिंपरी / चिंचवड
पुण्यतिथीनिमित्त न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये महात्मा गांधीना अभिवादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/photo_1.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सचिन आवटे, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिश, वरिष्ठ शिक्षिका हेमा शेलार, यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील राजकीय, सामाजिक शेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणा-या अनेक पैलूंवर आपले मनोगत व्यक्त केले. शिवांगी निस्ताने यांनी सूत्रसंचालन केले.