पुणे-आळंदी पालखी मार्गावरील अर्धवट गार्डन दुभाजकाचे काम मार्गी
![mahaenews](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/MNS-New-Flag.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
महापालिकेच्या पुणे-आळंदी पालखी महामार्गावरील चऱ्होली फाटा ते दिघी, दत्तनगर या मुख्य सेवा रस्त्याशेजारील अर्धवट गार्डन डीवाईडरच्या कामाची उद्यान विभागाचे ‘ई‘ प्रभागाचे वृक्षसंवर्धन पर्यवेक्षक गायकवाड यांनी पाहणी केली.
सर्व डीवाईडर काउंटिंग करून लवकरात लवकर काम सुरू करू व गार्डन तयार करू, असे आश्वासन यावेळी गायकवाड यांनी दिले. याप्रसंगी मनसे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष अंकुश तापकीर व महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
पुणे-आळंदी पालखी महामार्गवरील चऱ्होली फाटा ते दिघी, दत्तनगर या परिसरातील मुख्य सेवा रस्त्याशेजारील अंदाजे ४ ते ५ किलोमीटर अंतरावरील गार्डन डीवाईडरचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या अर्धवट कामांमुळे या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. १५ दिवसाच्या आत याबाबत महापालिकच्या उद्यान विभागाकडून कार्यवाही न झाल्यास, शहर मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत, महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती मनसेच्या भोसरी विधानसभेचे अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी यावेळी दिली.