पिंपळे गुरव येथील मंदिर दुर्घटनेला नेते मंडळीच जबाबदार – राजेंद्र जगताप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/rajendra-jagtap.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपळे गुरव येथील शंभर वर्षाचे पारंपरिक मंदिर असताना सत्ताधारी नेते मंडळींनी या जागेत महादेव मंदिर बांधले. त्यामुळे मंदिर दुर्घटनेला नेते मंडळीच जबाबदार असल्याची टिका राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी भाजपच्या नेत्यांवर नाव न घेता केली आहे. या दुर्घटनेत निष्पाप लोकांचा बळी गेला आहे.
पिंपळे गुरवमध्ये बेकायदेशीर बांधकामे होत आहेत. त्याला नेते मंडळीच जबाबदार आहेत. अनधिकृत बांधकाम होण्यासाठी नेते मंडळीच प्रोत्साहन देतात. शासनाने अशा बेकायदेशीर बांधकामे करणा-यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. या भागामध्ये जवळपास एक हजार माजी सैनिक वास्तव्य करतात. त्यांना विरंगुळा घेता यावा म्हणून रितसर परवानगी घेऊन मंदिराच्या ठिकाणी पत्राशेड उभे केले होते. ते हटवून नेत्यांनी याठिकाणी मंदिर बांधण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही, असेही जगताप म्हणाले आहेत.