पिंपरी महापालिकेत अधिकारांचा गैरवापर करणा-या 147 जणांवर शास्तीची कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/3-16.jpg)
आयुक्तांचा कारवाईचा बडगा; 1 जाने ते 31 डिसेंबरपर्यंतची शास्तीचा अहवाल
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वर्ग एक ते चार पदांच्या अधिकारांचा गैरवापर करणा-या तब्बल 147 अधिकारी- कर्मचा-यांवर आयुक्तांनी शास्तीचा बडगा उगारला आहे. महापालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांना सक्त ताकीद, दंडात्मक शास्ती, खातेनिहाय चाैकशी, पदावतन करुन चाैकशी, सेवानिलंबित, वेतनवाढ स्थगित, सेवा समाप्त, फक्त पदावतन अशा प्रकारे विविध शास्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये विभाग प्रमुखांचा देखील समावेश आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे कामकाज गतीमान व पारदर्शक व्हावे, भ्रष्टाचार मुक्त कारभार व्हावा, याकरिता महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा सतत प्रयत्न सुरु असतात. मात्र, महापालिकेचे वर्ग एक ते चार पर्यंत अधिकारी-कर्मचा-यांनी चुकीच्या लागलेल्या सवयीमुळे भ्रष्ट व ढिम्म कारभार सुरु आहे. त्यात गेल्या वर्षभरात आयुक्तांनी अनेक अधिकारी व कर्मचा-यावर शास्तीचा बडगा उगारला आहे. तरीही अधिकारी-कर्मचा-यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळेच प्रशासनाकडून विविध प्रकारे त्यांना शास्ती करण्यात आलेले आहेत.
गेल्या वर्षभऱात सक्त ताकीद (12), दंडात्मक शास्ती (17), खातेनिहाय चाैकशी (18), पदावतन करुन खातेनिहाय चाैकशी (30), सेवानिलंबित करुन खातेनिहाय चाैकशी (2), वेतनवाढ स्थगित (59), सेवा समाप्त (7), फक्त पदावतन (2) अशा प्रकारे 147 जणावर कारवाई करण्यात आलेली आहे.
बड्या अधिका-यांवर दंडात्मक कारवाई – नगररचनाचे राजेंद्र पवार (दंड 250 रुपये), डाॅ. पवन साळवे (दंड 200 रुपये), कार्यकारी अभियंता संजय खाबडे (दंड 100 रुपये), उपअभियंता दिलीप धुमाळ (दंड 100 रुपये), पशुवैद्यकीय डाॅ. अरुण दगडे (दंड 500 रुपये), उपशहर अभियंता रामदास तांबे (दंड 500 रुपये), सहशहर अभियंता राजन पाटील (दंड 500 रुपये), कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार (दंड 250 रुपये), सहशहर अभियंता श्रीकांत सवणे (दंड 250 रुपये), कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे (दंड 250 रुपये), डाॅ. लक्ष्मण गोफणे (दंड 250 रुपये), सहायक आयुक्त स्मिता झगडे (दंड 250 रुपये), आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. के.अनिल राॅय (दंड 250 रुपये)
वेतनवाढ स्थगित कारवाई – डाॅ. स्वरुप गायकवाड, डाॅ. संजय सोनेकर, डाॅ. विनायक पाटील, डाॅ. राहूल साळुंखे, डाॅ. श्रीकांत शिंगे, उपअभियंता विजयकुमार काळे, किशोर महाजन, लेखापाल प्रविणकुमार देठे
सक्त ताकीद –उपशहर अभियंता रामदास तांबे, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, क्रीडाचे राजेंद्र नागपुरे, लिपिक विजय लांडे, मुख्यलिपिक ज्ञानेश्वर भक्तीप्रसाद, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. अरुण दगडे