breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहराचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद!

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून रावेत आणि निगडी येथील अशुध्द जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.30) पाणी पुरवठा यंत्रणा बंद ठेवल्याने सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळचा देखील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने प्रसिध्दीपत्रकांद्वारे केले आहे.

रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 येथे पाणी शुद्ध करुन शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक कामे आणि सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक, पाणीपुरवठा विषयक नियमित कामे केली जाणार आहेत.

त्यासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागातील सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारचा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उलब्ध पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button