Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
खासदार शरद पवार पिंपरी-चिंचवड महापालिकेत दाखल;कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार

पिंपरी– राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार पिंपरी-चिंचवड महापालिकेत दाखल झाले आहेत. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. वॉर रूमला देखील भेट देणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्या 50 हजार पार झाली आहे. दररोज एक हजाराच्या पुढे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.
त्या पार्शवभूमीवर शरद पवार शहरात दाखल झाले आहेत. पालिकेतील कोरोना वॉर रूमला देखील भेट देणार आहेत. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.





