पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार
![पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/IMG_20210108_153007.jpg)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंचवडमध्ये केली घोषणा
पिंपरी |महाईन्यूज|
पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश केल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतही लगतच्या काही गावांना घ्यायचे आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे शहराची हद्दवाढ वाढ होवून नवीन गावांना महापालिकेत समाविष्ट करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी कर्मचा-यांचे आरोग्य चांगले रहावे, याकरिता स्मार्ट वाॅच आणि सायकलचं वाटप करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते. महापाैर उषा ढोरे, मावळचे आमदार सुनील शेळके, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/IMG_20210108_153000-1024x682.jpg)
अजित पवार म्हणाले, गावांचे मिळून पिंपरी-चिंचवड शहर तयार झाले. येथील विकासकामे करताना वाईटपणा स्वीकारावा लागला. पुणे-मुंबई महमार्गाचे रुंदीकरण करताना अनेक घरे हटविण्यात आले. तत्कालीन आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचेही घर काढले. विकासकामांसाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महापालिकेतील गैरकारभाराची चर्चा होत असते. त्याबाबत आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, त्यानंतर चाैकशी करता येईल.
तिन्ही आमदारांची कार्यक्रमास अनुउपस्थित..
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पिंपरीचे राष्ट्रवादी आमदार आण्णा बनसोडे, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हे अनुउपस्थित होते. परंतू पिंपरी पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्रमाला तिन्ही आमदारांनी अनुउपस्थित राहिले होते.