breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अपर आयुक्त पदी साहेबराव गायकवाड यांची नियुक्ती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अपर आयुक्त पदी पुण्याचे अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम , २००५ मधील कलम ४ ( ४ ) व ४ ( ५ ) अनुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याच्या साहेबराव गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, पुणे यांची सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय कारणास्तव अपर आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या रिक्त पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्यात येत आहे. असा आदेश शासनाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी काढला आहे.

राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्याविषयीच्या कामकाजाबाबतचे गांभीर् , तातडीची निकड व अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन सदर आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशातील उक्त अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहन अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांचे काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियम ४०, परिशिष्ट – २ मधील विहित अटी व शर्ती लागू राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button