पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंतापदी राजन पाटील यांची वर्णी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/rajan-patil-.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे पद रिक्त झाले आहे. या रिक्त झालेल्या शहर अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार सहशहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
महापालिकेच्या शहर अभियंता अंबादास चव्हाण हे वयोमानानुसार 30 एप्रिल 2019 रोजी निवृत्त झाले. त्यानंतर रिक्त झालेल्या शहर अभियंतापदाचा तात्पुरता पदभार सहशहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने प्रशासकीय आवश्यकता म्हणून तुर्तास त्यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, महापालिकेतील अभियंता संवर्गातील अधिका-यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार राजन पाटील हेच शहर अभियंता म्हणून कायम होतील. राजन पाटील यांच्याकडे सध्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, निर्मूलन विभागाचा कार्यभार आहे.
अंबादास चव्हाण यांच्याबरोबर कार्यकारी अभियंता दिपक सुपेकर हे देखील निवृत्त झाले आहेत. त्यांमुळे त्यांचा स्थापत्य विभागाचा कार्यकारी अभियंतेपदाचा अतिरिक्त पदभार कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.