पिंपरी चिंचवड :कोविड 19 रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/1598605872600.png)
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे अटो क्लस्टर येथे 200 खाटांची क्षमता असलेलं कोविड 19 रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे , त्याचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले .
यावेळी अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालय हे कौतुकास पात्र आहे . रुग्णालयाच्या उदघाटन प्रसंगी महापालिकेचा अभिमान वाटतो . आज मी शहरात तिसऱ्या कोविड रुगणालायचे उदघाटन करता आलो असून या पूर्वीचे दोन रुगणालय उभारणीसाठी राज्य सरकार , महापालिका मदतीने रुग्णालय उभारण्यात आले . परंतु 200 क्षमता असलेल्या रुग्णालयाच्या उभारणीला कोणतीही मदत न घेता महानगरपालिकेकडून हे रुग्णालय उभारले असल्यामुळे आनंद होत असल्याचे पवार म्हणाले .
प्रमुख उपस्थितीत भा.ज.पा. प्रदेश अध्यक्ष मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील ,आमदार श्री.लक्ष्मणभाऊ जगताप ,श्री.महेश दादा लांडगे,खा.श्रीरंगजी बारणे.महापौर सौ.माई ढोरे, उपमहापौर श्री.तुषारजी हिंगे पक्षनेत श्री नामदेव ढाके,स्थायी समिती सभापती संतोष लोंढे,आयुक्त श्रावणजी हार्डिकर होते