breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये हूक्का पार्लर खुलेआम सुरु, हाॅटेल चालकांवरील कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष

‘थर्टी फस्ट’साठी पिंपरी-चिंचवडमध्ये विविध हाॅटेल चालकांकडून जोरदार तयारी

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवडमधील विविध हाॅटेल चालकांकडून जय्यत तयारी सुरु आहे. त्यात रावेत, वाकड, पिंपळे साैदागर, हिंजेवाडी, देहूरोड, तळेगाव आदी परिसरात हूक्का पार्लर व्यवसाय खुलेआम सुरु आहे. त्या कारवाईकडे संबंधित हद्दीतील वरिष्ठ पोलिस अधिका-यांचे हात बांधल्याने कारवाईकडे डोळेझाक होत आहे. विशेषता रावेतच्या भोंडवे काॅर्नरवरील एका हाॅटेलमध्ये दिवसाढवळ्या हुक्का पार्लर सुरु असून पोलिस कोणतीही कारवाई करीत नसल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.

नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांसाठी आतापासूनच नियोजन सुरू झाले आहे. शहरातील पंचतारांकित हॉटेल्ससह मोटेल्स, पब्जमध्ये पार्ट्यांची तयारी सुरू झाली. थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक हाॅटेल चालकांनी थर्टी फस्टची जय्यत तयारी केलेली आहे. त्यात हाॅटेल चालकांनी अवैधपणे दारु विक्री, हुक्कापार्लरसह अनेक अवैधधंदे सुरु केलेले आहेत. त्यासाठी हॉटेल, मोटेल, पब्जला व्यवस्था करण्यात येवू लागली आहे. तसेच नागरिकांकडून अनेकदा प्रवेश कर घेण्यात येतो. अशा प्रवेश कर आकारणाऱ्या आयोजकांनी त्याची परवानगी घेऊन करमणूक कर भरणे आवश्यक आहे. परंतू, करमणूक कर कोणीही भरत नाही. उलट ग्राहकांना लूटण्याचाच प्रकार हे चालक करीत आहेत

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर अवैध धंद्याना चाप बसेल, दादागिरी, गुंडगिरी बंद होईल, गुन्हेगारांना लगाम लागेल, अशी अपेक्षा असताना उलट दिवसेंदिवस अवैधधंदे वाढतच चालले आहेत. विशेषता त्या-त्या भागातील वरिष्ठ पोलिस अधिका-याचा अवैध धंदे करणा-यांना आर्शिवाद मिळाल्याने पोलिसांची खाकी बदनामा होवू लागली आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाकड, पिंपळे साैदागर, हिंजेवाडी, रावेत, पुनावळे, देहूरोड, तळेगाव, चाकण आदी परिसरात विविध हाॅटेलमध्ये अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. त्यात हुक्का पार्लर, अवैध दारु विक्री जोरात आहे.

थर्टी फर्स्टला रात्री बारावाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाते. तसेच, इनहाऊस मद्य पार्ट्यांना गृह खात्यामार्फत पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात येते. मात्र, यंदाच्या परवानगीबाबत कोणतीही सूचना अद्याप गृह खात्याने काढलेली नाही. यासंदर्भातील आदेश लवकरच काढले जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत हाॅटेल चालकांनी जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button