breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र कारागृहाची आवश्यकता; राज्यमंत्र्यांकडे आमदार चाबुकस्वार यांचा पाठपुरावा

पिंपरी – पुण्यातील येरवडा कारागृहातील बंद्यांची क्षमता मर्यादीत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये येरवडा झेलच्या धरतीवर स्वतंत्र कारागृह करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी विधानसभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार चाबुकस्वार यांनी राज्यमंत्री पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना पंधरा ऑगस्ट रोजी होत आहे. आता पिंपरी-चिंचवड कारागृहाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी पुण्यातील येरवडा झेलच्या धरतीवर पिंपरी-चिंचवडमध्ये कारागृह करण्याची गरज आहे. येरवडा झेलमधील बंद्यांची क्षमता सुमारे दोन हजार आहे. तरीही, आजरोजी पाच हजार कैदी बंदीस्त आहेत. ही संख्या पाहता पिंपरी-चिंचवड कारागृह सुरू करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठीची प्रक्रिया तुरंत होण्याची अपेक्षा आहे, असे आमदार चाबुकस्वार यांनी राज्यमंत्री पाटील यांना सूचविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button