पिंपरी चिंचवडमध्ये विजेच्या शाॅक लागून बालकांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/IMG-20180627-WA0036.jpg)
पिंपरी – रस्त्यावरून विजेच्या खांबाजवळून जात असताना एका नऊ वर्षीय बालकाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना ओटा स्कीम, निगडी येथे मंगळवारी (ता.२५) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.
हरीओम विनायक नराल – (वय ९, रा.पंचशील हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम हा मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ओटा स्कीम येथील अंकुश चौकातून रस्त्याने पायी चालला होता. तो विजेच्या खांबाजवळून जात असताना त्यास विजेचा जोरदार झटका लागला व तो बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित केला. मात्र त्यानंतरही या ठिकाणी विद्युत प्रवाह येत असल्याचे दिसून आले. यामुळे वीजचोरीतून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी व्यक्त केली.