breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनला दिवसभर नागरिकांनी घरात राहून चांगला प्रतिसाद दिला. पोलिसांनी सकाळपासूनच आपल्या व्हॅनमधून शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन सूचना केल्या. रस्त्यावरून विनाकामाचे फिरणा-यांना घरी जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे रस्त्यावर तुरळक प्रमाणात वाहने दिसत होती.

कोव्हिड 19 चे वाढते प्रमाण रोखण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून सलग दहा दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांनी दोन दिवसांपूर्वीच दैनंदीन सर्व साहित्य खरेदी केल्यामुळे त्यांनाही कोणत्याच प्रकारची अडचण उद्भवल्याचे काही अंशी वगळता दिसून आले. छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. रस्त्यावरून वाहनांची वर्दळ कमी दिसत होती. एकंदरीत लॉकडाऊनला पिंपरी-चिंचवडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य चौकात बराच वेळाने एखादी दुचाकी दिसत होती. चिंचवडमध्ये पूर्णपणे बंद पाळण्यात आला. पिंपरी मार्केट, काळेवाडी, वाकड, कासारवाडी, भोसरी, निगडी, थेरगाव, डांगे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव भागात कडेकोट बंद पाळण्यात आला. एकंदरीतच पिंपरी-चिंचवडकरांनी या बंदला चांगला प्रतिसाद दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button