पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एटीएम’ फोडणा-या सराईताला अटक, दोन फरार साथिदारांच्या हरियाणात आवळल्या मुसक्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Arrest-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भोसरी आणि चिखली येथील एटीएम मशीन फोडून 11 लाखांची रोकड लंपास करणा-या सराईताला अहमदनगर जिल्ह्यातील आळेफाटा याठिकाणी अटक केली. त्याला वर्ग करून गुन्ह्यांची उकल केल्यानंतर त्याच्या दोन साथिदारांना हरियाणातील नुहू जिल्ह्यातून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपी अभिजीत उर्फ निकेतन गोकूळ साळवे (वय 24, रा. हरिनिवाह बिल्डींग, जिल्हा नाशिक), राहूल भगवान साळवे (वय 24, रा. द्वारका, नाशिक), अरुण ज्ञानेश्वर भांगरे (वय 24, रा. संगमनेर, जिल्हा नगर), सागर अनिल दैवज्ञ (वय 25, रा. पारनेर, जिल्हा नगर) या चार गुन्हेगारांना पुणे ग्रामीण पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. त्यांच्या गुन्ह्याची उकल होताना पोलिसांना पिंपरी-चिंचवडमधील एटीएम फोडीच्या घटनेचा सुगावा मिळाला. एटीएम फोडीच्या घटनांमध्ये वकिल उर्फ शकील मोहमद हारून (रा. खुलीका, ता. हतीन, जि. पलवाल, हरियाणा) याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली.
पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्काळ पिंपरी-चिंचवड पोलिसांना याची खबर दिली. त्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष पथक दिल्लीकडे रवाना झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पिंपरी-चिंचवडमध्ये आणले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत 28/12/2019 रोजी भोसरीतील फोडलेल्या एटीएमचे तांत्रीक पुरावे प्राप्त झाले. चारचाकी गाडीतून चार साथिदारांसह येऊन 10/11/2019 रोजी नेवाळे वस्ती येथील अॅक्सिस बॅंकेचे एटीएम फोडल्याची कबुलिही त्याने दिली. तब्बल 11 लाख 50 हजार 100 रुपयांची रक्कम त्यांनी एटीएमसह उचकटून लंपास केली होती. त्याला न्यायालयाने 13/1/2019 रोजीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती.
या गुन्ह्यातील त्याचे अन्य चार साथीदार हे हरियाणा येथील नुहू जिल्ह्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांना शोधण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचा-यांचे पथक 4/1/2020 रोजी हरियाणात पाठविण्यात आले. तेथून जाकर उर्फ जाकीर इद्रीस खान (वय 36, फिरोजपूर, झिकरा, जि. नुहू, मेवाल, हरियाणा ) आणि इनाम नसरू खान (वय 33, रा. वरील ठिकाण) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता 17/1/2020 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून एक कार, गॅस कटर, चोरीसाठी वारलेले अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे.