पिंपरी चिंचवडमध्ये आज 1 हजार 188 जणांना डिस्चार्ज, 997 नवीन रुग्ण, 16 मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-Corona-virus.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड शहरात आज 997 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 65 हजार 379 झाली. आज शहरातील एक हजार 188 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 51 हजार 510 झाली. आज 16 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील नऊ व शहराबाहेरील सात जणांचा समावेश आहे. शहरातील एकूण मृत्यू संख्या एक हजार 65 झाली आहे. सध्या नऊ हजार 535 रुग्ण सक्रिय आहेत.
आज मृत झालेल्या व्यक्ती निगडी (पुरुष वय 68), विद्यानगर (स्त्री वय 25), पिंपळे गुरव (पुरुष वय 55), काळेवाडी (स्त्री वय 65), चिंचवडगाव (स्त्री वय 73 व पुरुष वय 71), संभाजीनगर (पुरुष वय 75), विकासनगर देहूरोड (स्त्री वय 55), चाकण (पुरुष वय 63), देहूगाव (पुरुष वय 58), कराड (पुरुष वय 74), कामशेत (पुरुष वय 59), मारुंजी (स्त्री वय 62), माहूर (पुरुष वय 88), राजगुरूनगर (स्त्री वय 67) येथील रहिवासी आहेत.