breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवडमधील 32 पोलिस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत?

पुणे पोलिसाचं महासंचालकांना पत्र

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड आयुक्तालयात 32 पोलिस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत असल्याचं उघड झालं आहे. एक पोलीस निरीक्षक, 23 सहाय्यक पोलीस निरीक्षक तर 8 पोलीस उपनिरीक्षक अनधिकृत आहेत. पुणे आयुक्तालयातून नव्याने झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीने हा घोळ झाल्याची चर्चा आहे.

पुणे शहर आयुक्तालयातून वर्ग होऊन नवीन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मोठ्या थाटामाटात स्थापन झाले. परंतु दोन पोलीस आयुक्त कार्यलयातील वाद अधिकच वाढत चालला आहे.  पुणे पोलिसांनी तब्बल 32 पोलीस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत असल्याचे पत्र, महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे पाठवलं आहे. पुणे पोलीस आयुक्त कार्यलयामधून पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यलयामध्ये नेमणुकीला आलेले 32 पोलीस अधिकारी या पत्रामुळे मात्र धास्तावले आहेत, याबाबत पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यावर बोलण्यास नकार देत आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button