breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

नवी दिल्ली –  राष्ट्रपती पोलीस पदकांची आज (शुक्रवार) घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर यांचा समावेश आहे. उद्या शनिवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी देशातील पोलिसांना त्यांच्या विशेष शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली जातात. यावर्षी ३ पोलिसांना पीपीएमजी पुरस्कार तसेच राष्ट्रपती पुरस्काराअतंर्गत १४६ पोलिसांना पोलीस शौर्य पदक (पीएमजी), ७४ पोलिसांना उत्कृष्ट सेवा राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएमडीएस ) आणि ६३२ पोलिसांना पोलीस पदक (पीएमएमएस) जाहीर करण्यात आली आहेत.

दरम्यान, गणपतराव माडगुळकर हे संध्या पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त म्हणून माडगूळकर काम पाहत आहेत. त्या ठिकाणीही त्यांनी इंदोरी येथील गुन्हेगारी मोडीत काढली. देहूरोड विभागात गेले दीड वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या सुमारे पन्नास ते साठ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करून आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे. ही महाराष्ट्रातील मोक्का कायद्यांतर्गत मोठी कारवाई आहे. त्यांच्या तपास पद्धतीवर आजपर्यंत रूपांतरित करून पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

गणपतराव सदाशिव माडगूळकर यांचे प्राथमिक शिक्षण आटपाडी तालुक्यातील माडगूळे गावी झाले आहे. माध्यमिक शिक्षण देवापूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहात झाले आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण हे पुणे कृषी महाविद्यालय व उच्च शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झाले आहे. त्यांनी हे शिक्षणही कमवा आणि शिका योजनेत घेतले होते. त्याचे वडील शेतकरी होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button