Breaking-newsपिंपरी / चिंचवड
पिंपरीत रेल्वेलगतच्या झोपड्यांवर कारवाई ; रहिवाशांची पोलिसांवर दगडफेक

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरीतील निराधारनगरच्या रेल्वे लाईनलगतच्या अनधिकृत झोपड्यांवर आज (शनिवार) रेल्वे प्रशासनाने कारवाई केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी घरांना आगी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
निराधारनगर येथे रेल्वे लाईनलगत सुमारे २०० अनधिकृत झोपड्या उभा करण्यात आल्या आहेत. या झोपड्यावर रेल्वे प्रशासनाने आज सकाळीच ८ वाजल्यापासून दोन जेसीबीच्या सहाय्याने धडक कारवाई करण्याची तयारी केली होती. दरम्यान येथील नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. त्यानंतर या ठिकाणी रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान पोलिसांच्या दिशेने नागरिकांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे या परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.





