पिंपरीत बंडाचा इशारा, रातोरात बदलला राष्ट्रवादीने उमेदवार
माजी आमदार आण्णा बनसोडे यांची उमेदवारी एबी फाॅर्मसह भरली
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी बंडा इशारा देताच राष्ट्रवादी काँग्रेसने रातोरात उमेदवारी बदलली आहे. राष्ट्रवादीकडून नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना उमेदवारी जाहीर केलेली, मात्र, अचानक उमेदवारी आज बदलली आहे. त्यामुळे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह आज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे अर्ज सादर केला आहे.
राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर केली होती. त्यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नगरसेविका सुलक्षणा धर यांना जाहीर झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ नाराज झाले होते. दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन बंडाचा इशारा दिला होता. अपक्ष लढणार असल्याचे बनसोडे यांनी जाहीर केले. माजी आमदार बंडखोरी करणार असल्याने पक्षातील घडामोडींना वेग आला. मोठी खलबते झाली. त्यामुळे रात्रीत उमेदवार बदलण्याचा निर्णय घेत बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.