पिंपरीत पार्थ पवारांच्या प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190405-WA0007.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पुण्याच्या राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचारास सुरुवात करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरात पार्थ पवार यांच्या प्रचाराची धुरा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्यावर आहे. शहरातून पार्थ पवारांना लीड मिळवून देण्यासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. तसेच त्यांच्या पत्नी उषाताई वाघेरे पाटील या देखील तेवढ्याच ताकदीने उतरल्या आहेत. आज पिंपरीगावातील बालमल चाळ, भीमनगर, वाघेरे कॉलनी व पिंपरी कॅम्प भागातील प्रत्येक घरात, दुकानात जाऊन पार्थ पवार यांचा प्रचार करण्यात येत आहे. येथे भरवण्यात येणाऱ्या शेतकरी आठवडे बाजारात जाऊन तेथील शेतकरी, नागरिकांशी संवाद साधला जात आहे.
यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे पाटील, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा गिरीजाताई कुदळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे, चेतन दुबल, आबा कुदळे, संतोष वाघेरे, निलेश नाणेकर, दत्ता पोकरकर, युवानेते ऋषिकेश वाघेरे पाटील, उंबकर ताई, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.