Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरीतील मटण मार्केटच्या मटका अड्ड्यावर छापा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/crime_1482259366-1.jpeg)
पिंपरी – पिंपरीमधील मटण मार्केटमधील मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये तिघेजण मटका खेळताना आढळले. त्या तिघांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
हृषीकेश उर्फ बाळू काळुराम शिनगारे (वय 38), महम्मद मोहसीन महम्मद खालीद (26, दोघे रा. काळेवाडी) आणि गोविंद रवींद्र सोनवणे (26, रा. पिंपरी) अशी करवाई करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील मटण मार्केटमध्ये मटका घेण्यात येत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून मटका अड्ड्यावर छापा मारला. घटनास्थळावर तिघेजण मटका खेळताना आढळून आले. मटका खेळणा-या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच मटका खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.