Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरीतील अजमेरा कॉलनीतील ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट; तीन तास वीज पूरवठा खंडीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/DSC_2322.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरीतील अजमेरा कॉलनीतील ट्रान्स्फॉर्मरचा शुक्रवारी (दि. 25) स्फोट झाला. ही घटना दुपारी घडल्याने सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेनंतर या परिसराचा वीजपुरवठा तीन तास खंडित झाला होता.
अजमेरा कॉलनीत गणेशभक्त कै. महादेव गोविंद कदम प्रवेशद्वार येथे महावितरणचा ट्रान्स्फॉर्मर आहे. शुक्रवारी (दि.25) दुपारी साडे तीनच्या सुमारास या ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट होऊन आग लागली. या स्फोटानंतर ट्रान्स्फॉर्मरमधील उकळते तेल रस्त्यावर लांब अंतरावर उडून पडले. दुपारी याठिकाणी फारशी वर्दळ नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ही घटना घडल्यानंतर महावितरणच्या अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सायंकाळी उशिरापर्यंत ट्रान्स्फॉर्मरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. तर बुशिंग फुटल्याने ही घटना घडल्याचे महावितरण प्रशासनाचे म्हणने आहे.