पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे थेट विधानभवनात शपथ घेताना दिसले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/359247-annabansode.jpg)
पुणे – राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट फुटल्याचं म्हटलं गेलं. यावेळी 12 आमदारांपैकी अगदी शेवटपर्यंत अजित पवारांसोबत राहिलेले आमदार म्हणजे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे हे पवारांच्या राजीनाम्यानंतर थेट विधानभवनात शपथ घेताना दिसले.
राजकीय भूकंपानंतर 12 आमदारांसह अण्णा बनसोडेदेखील गायब असल्याच म्हटलं गेलं. हे आमदार आज विधानभवनात शपथविधी घेताना दिसले. शपथविधी घेतल्यानंतर बनसोडेंनी ‘जय राष्ट्रवादी’अशी घोषणा न देता,’जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली. त्यांची ही घोषणा शिवसेनेच्या थाटातील नारा असल्याचं समजलं गेलं.
अगदी 78 तासांचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांचे समर्थक म्हणून अण्णा बनसोडे ओळखले जातात. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे आणि त्यांचे कुटुंबीय नॉट रिचेबल होते. पण आता गायब झालेले बनसोडे थेट शपथ घेताना पहिल्यांदाच विधीमंडळात दिसले.