पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी महापालिका करणार 2500 कोटींचा खर्च
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/pcmc.jpg)
पिंपरी | महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2500 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली आहे. त्याचे सादरिकरण पदाधिका-यांच्या बैठकीत आज करण्यात आले. नदीपात्रात सोडले जाणारे दुषीत पाणी शुध्दीकरण प्रक्रियेद्वारे सोडण्यासाठी या प्रकल्पांतर्गत सक्षम यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात आज पदाधिका-यांची बैठक झाली. त्यामध्ये नदी सुधार प्रकल्पाचे सादरिकरण पर्यावरण विभागाने केले. पर्यावरणाचा समतोल राखून हा प्रकल्प राबविण्यासाठी यामध्ये पर्यावरण प्रेमींना सामील करून घेतले जाणार आहे. नदी सुधार प्रकल्पांतर्गत पवना नदी पात्राच्या काठावरून स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्याचे काम सध्या हाती घेतले आहे. पवना नदीसाठी 1400 कोटी रुपये खर्च येणार आहे. तर, इंद्रायणी नदीसाठी 1100 कोटींचा खर्च येत असल्याचे बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती उपमहापौर तुषार हिंगे यांनी सांगितली.
शहरातील मोठ-मोठ्या कंपन्यांमधून बाहेर पडणा-या दुषीत पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपनींचा स्वतंत्र एसटीपी प्रकल्प आहे. परंतु, छोटे-छोटे पार्ट्स तयार करणा-या छोट्या कंपन्यांमधून प्रक्रिया युक्त पाणी सोडले जात नाही. त्यामुळे अशा छोट्या कंपन्यांसाठी पालिका स्वतंः लाईन टाकून तत्सम यंत्रणा कार्यान्वीत करणार आहे, अशीही देण्यात आल्याचे हिंगे यांनी सांगितले.