Breaking-newsपिंपरी / चिंचवड
पावना नदीपात्रात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
![गावठी हातबॉम्ब स्फोटात एकाचा मृत्यू, दोघे जखमी ; माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील घटना](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Deadbody.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
सांगवी येथे पवना नदीपात्रात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज मंगळवारी (दि. 4) सकाळी साडेनऊच्या सुमारास रहाटणी अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांना याची माहिती मिळाली. त्यांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
अग्निशामक विभागाच्या माहितीनुसार, सांगवी येथील पवना नदीपात्रात मृतदेह असल्याचा कॉल रहाटणी येथील अग्निशामक दलाच्या कार्यालयात आला. त्यावर फायरमन मनोज मोरे, विलास पाटील, विशाल पोटे यांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. तरुणाचे वय अंदाजे 25 आहे. त्याची ओळख पटलेली नाही.