Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
पालखी बंदोबस्त, डोक्यावरून चाक गेल्याने पोलिसाचा जागीच मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/milind-makasare-696x365.jpg)
पुणे – येथील फातिमानगरमध्ये क्रोम मॉल चौकात भीषण अपघात झाला असून पालखी बंदोबस्त लावण्यासाठी निघालेल्या लष्कर पोलिसाचा अपघाती मृत्यू झाला आहे. मिलिंद मकासरे असे मृत पोलिसाचे नाव आहे. पहाटे 5 वाजता ही घटना घडली.
पालखी बंदोबस्त लावण्यासाठी लष्कर पोलीस स्टेशनचे डीओ मिलिंद मकासरे हे जात होते. फातिमानगरातील क्रोम मॉल चौकात त्यांच्या डोक्यावरुन अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने मकासरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.