Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
पार्थ पवार यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे पनवेल येथे उदघाटन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190411-WA0009.jpg)
पनवेल – राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज पनवेल येथे करण्यात आले. पनवेल येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते मावळ मतदारसंघाचे आघाडीचे निरीक्षक रमेश किर यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेस नेते आर सी घरत, कामगार नेते महेंद्र घरत,शिवदास कांबळे,नगरसेवक गणेश कडू, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, महापालिका विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण, पनवेल महापालिकेचे नगरसेवक,नगरसेविका यांच्यासह आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवदास कांबळे म्हणाले की, ज्यावेळी 26 जुलै चा महापूर आला. त्यावेळी पनवेल मध्ये पहाटे 5 वाजता येणारे शरद पवार हे एकमेव व्यक्ती आहे. त्यामुळे पार्थ पवारांना मतदान करून शरद पवार यांचे ऋण फेडण्याची हीच संधी आहे. पार्थ पवार मावळ मध्ये निवडून येऊन दिल्लीत हमखास जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे. त्याच अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत असा ठाम विश्वास शिवदास कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला.
देशाचे भवितव्य असणाऱ्या तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे आश्वासन यावेळी उमेदवार पार्थ पवार यांनी केले. त्याचबरोबर आयटी पार्क देखील पनवेल येथे लवकर आणून रोजगाराना वाव देऊन तरुणांचे विविध प्रश्न सोडवणार असल्याचेही पार्थ पवार यांनी उपस्थितांना सांगितले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190411-WA0008-300x225.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190411-WA0010-300x225.jpg)
यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस सचिव रमेश किर यांनी राफेल मुद्यावरून सरकारवर निशाणा साधला. टीका करत असताना ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग देखील मनमानी करू शकत नाही. याचं उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदींच्या बायोपिकला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. कारण जनमत ज्यावेळी निर्माण होतं. त्यावेळी ही लोक दबली जात आहेत असा सरकारवर टोला देखील यावेळी लगावण्यात करण्यात आला.