breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पार्थ पवारांनंतर मावळमधून आर आर आबांची कन्या स्मिताच्या नावाची चर्चा

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव मागे पडल्यानंतर आता स्वर्गीय आर आर आबा पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. स्मिता पाटील मावळमधून लढण्यास इच्छुक आहेत का? याबाबतची प्राथमिक चाचपणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे. स्मिता पाटील यांनी विचार करून निर्णय कळवू, असे सांगितल्याचेही बोलले जात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार इच्छुक आहेत. त्यामुळे गेली सहा महिने पार्थ पवार मावळ पट्ट्यात फिरताना दिसत आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरात पार्थ पवार यांची हवा करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजीही करण्यात आली होती. मात्र, मागील 10-12 दिवसापूर्वी शरद पवार यांनी माझ्याव्यतिरिक्त पवार कुटुंबातील लोकसभेला कोणीही उमेदवार नसेल असे सांगत पार्थ यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले होते.

स्मिता पाटील यांचा विवाह गेल्या वर्षी दौंडचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात यांचा पुतण्या आनंदसोबत झाला आहे. आनंद बांधकाम व्यवसायिक असून, सध्या त्यांचे वास्तव्य पिंपरी- चिंचवड शहरातील प्राधिकरण भागात आहे. स्मिता लग्नानंतर पतीसोबत प्राधिकरणात राहत आहेत. त्यामुळे स्मिता पाटील या आता पिंपरी- चिंचवडकर झाल्या आहेत. त्यामुळे स्मिता यांच्या नावाचा विचार राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

आर आर आबांनी 2008 साली राज्यातील डान्स बारवर बंदी घातली होती. मात्र, आबांच्या निधनानंतर भाजप सरकारने डान्स बार काही अटी घालून उठवली आहे. मात्र, आबांच्या डान्स बार बंदीचा वारसा स्मिता चालवत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल विधानसभा मतदारसंघ आहे. येथेच मोठ्या प्रमाणात डान्स बार सुरू आहेत. याविरोधात स्मिताने आवाज उठवला आहे. त्यामुळे स्मिताला या भागातून सामान्य लोकांचा प्रतिसाद मिळेल असाही कयास राष्ट्रवादीतून लावला जात आहे. पिंपरी-चिंचवड व मावळ भागात राष्ट्रवादीची ताकद आहे. पनवेलसारख्या शहरी भागातून स्मिताला मतदान झाल्यास राष्ट्रवादी बाजी मारू शकते असे राष्ट्रवादीतील एका गटाला वाटते. मात्र, स्थानिक नेते, पदाधिकारी स्मिता पाटील यांचे काम करतील का? याबाबत शंका आहे. त्यामुळे स्मिता पाटील यांनी विचार करून निर्णय कळवते, असे पक्षातील वरिष्ठांना सांगितल्याचे कळते.

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button