पहिल्या मजल्यावरून पडल्याने साडेतीन वर्षांचा मुलगा जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Om-Injured.jpg)
पिंपरी:- पिंपरीत पहिल्या मजल्यावरून पडल्याने साडेतीन वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो थोडक्यात बचावला आहे. ओम ओड असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
ओम हा पिंपरी चिंचवड भागात असलेल्या फुलेनगरमध्ये रहातो. ओमच्या घरात त्याची आई, मोठा भाऊ आयुष हे सगळे होते. ओमचा भाऊ आयुष घरात खेळत होता आणि ओम बाहेर खेळत होता. अचानक ओम आईला दिसेनासा झाला म्हणून त्याची आई त्याला शोधायला लागली. आई त्याला शोधत असतानाच तळमजल्यावरच्या बाईने ओम खाली पडल्याचं ओरडून त्याच्या आईला सांगितलं. ओम खाली पडला ही बाब त्याच्या आईला समजताच त्यांनी तातडीने यशवंतराव स्मृती रूग्णालयात धाव घेतली.
ओम बेशुद्ध झाला होता, डॉक्टरांनी त्याला तपासले त्याचे सिटी स्कॅनही करण्यात आले. ओमच्या डोळ्याला आणि मेंदूला गंभीर मार लागला आहे. त्याचा एक डोळा सुजलेला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुलं खेळत असताना पालकांनी त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावं असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.