Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पत्नीच्या खूनाचा प्रयत्न करणा-या पतीला अटक, चिखली पोलिसांत तक्रार
पिंपरी, (महाईन्यूज) – कौटुंबिक वादातून पत्नीवर चाकुने वार करणा-या पतीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 19) दुपारी तीनच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे सार्वजनिक रस्त्यावर घडला आहे.
पती विजय पुंडलिक गोसावी (वय 28, रा. मतराला, ता. पानसेलम बडवाने, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची जखमी पत्नी जयश्री सुरेश गोसावी (वय 25, रा. गोकुळ सोसायटी, मोरेसवस्ती, चिखली) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि जयश्री यांच्यात घरगुती कारणावरून किरकोळ वाद होत होते. किरकोळ कारणावरून त्याने बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास संताप अनावर झाल्याने पत्नीच्या गळ्यावर धारदार चाकुने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी विजयला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.