निगडी उड्डाणपुलाची मुंबई-पुणे लेन सुरू करा, मनसेची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/13-1f2eaaa9-499f-41d0-b06a-ffeb56f36a66.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपुलाची मुंबई-पुणे लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष तथा महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.
यासंदर्भात चिखले यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, निगडी उड्डाणपुलाच्या मुंबई-पुणे लेनचे काम पूर्ण झाले आहे. सध्या पुण्याकडे जाणा-या वाहतुकीला चालू कामामुळे वळसा घालून जावे लागते. ही वाहतूक उड्डाणपुलावरून वळवल्यास पुलाचे खालील काम पूर्ण करता येणार आहे. अन्यथा हे काम पूर्ण करणे कठीण जाणार आहे.
पुलाला वळसा घालून पुण्याकडे जाणा-या वाहनांमुळे काम करताना अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या जीवाचा विचार करून ही वाहतूक पुलावरून सुरू केल्यास पुलाचे खालील काम करणे सोपे होणार आहे. त्यासाठी या मार्गावरील वाहतूक पुलावरून सुरू करण्यात यावी, अशी मागणी चिखले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.