Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
निगडीतील साईनाथनगरमध्ये टोळक्यांचा धुडगूस; चप्पलच्या दुकानावर केली दगडफेक

पिंपरी – निगडीतील साईनाथनगरमध्ये दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने दिवसाढवळ्या महागड्या गाड्यांची तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. तब्बल तासभर होऊन सुध्दा पोलीस घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मनसे शहराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सचिन चिखले यांच्या कार्यालयाशेजारील पार्क केलेल्या व्यावसायिकांच्या महागड्या गाड्यांच्या काचा फोडून मोठे आर्थिक नुकसान केले आहे. दुचाकीवरून दहा ते पंधरा तरुण तोंडाला बांधून याठिकाणी आले होते. त्यांच्या हातात कोयते, चॉपर, दांडके होते. चिखले यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना संपर्क साधून माहिती कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत निगडी पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे कामकाज सुरू आहे.





