Breaking-newsपिंपरी / चिंचवड

नागरी सुविधा केंद्र फोडून चोरट्यांनी मारला डल्ला

पिंपरी, (महाईन्यूज) – आकुर्डीतील नागरी सुविधा केंद्र फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. बशीर इब्राहिम सुतार (वय 58, यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतार यांचे आकुर्डीतील सिध्देश्वर क्लासिक बिल्डिंगमध्ये नागरी सुविधा केंद्र आहे. बुधवारी रात्री सातच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या ड्रॉवरमधील 16 हजार 730 रुपयांची रोकड आणि दोन हजार रुपये किमतीची एक हार्डसिस्क असा एकूण 18 हजार 730 रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button