नागरिकांच्या कामाला प्राधान्य देवू – आमदार महेश लांडगे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1-26.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
नागरिकांचे हित असलेल्या कामांना प्राधान्य देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असल्याचे मत भोसरी विधान सभेचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ४ दिघी मधील आरक्षण क्र. २/१२२ येथील शाळा इमारत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्य विकास
डोळस, लक्ष्मण उंडे, नगरसदस्या भिमाताई फुगे, नानी ऊर्फ हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, माजी नगरसदस्य दत्तात्रय गायकवाड, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, प्रविण घोडे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, दिघीकर विकास प्रतिष्ठाणचे उत्तम घुगे, रविभाऊ चव्हाण आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, विकसित करण्यात येणा-या आरक्षणांच्या जागा त्या भागातील भुमीपुत्रांच्या जागेत असतात त्यामुळे त्या जागी उभारण्यात येणा-या इमारतीस त्या भुमीपुत्रांचे नाव लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. त्याप्रमाणे येथील बांधकाम करण्यात येणा-या शाळेच्या इमारतीचे बापुसाहेब तुकाराम परांडे या नावाने नामकरण करण्याची सूचनाही त्यांनी केली. जे काही काम केले ते नागरिकांसाठी केले, त्यामध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज, शिक्षण, आरोग्य व वैद्यकीय सेवा विषयक कामांना प्राधान्य देण्यात आले. असेही ते यावेळी म्हणाले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/MG_6285-1024x605.jpg)
यावेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे म्हणाल्या, आरक्षित जागा ताब्यात घेऊन विकसित करणे हे अवघड काम असते. तथापि आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातुन दिघी येथे शाळेकरीता मोठी जागा उपलब्ध झाली त्याचा फायदा येथील स्थानिक नागरिकांना होणार आहे. असे सांगुन त्यांनी शाळेचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करुन शाळा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दयावी अशी सूचना संबंधित अधिका-यांना यावेळी दिली.
दिघी येथील उभारण्यात येणा-या शाळेच्या बांधकामाचे क्षेत्रफळ ३८८७ चौ.मि. असून याकामी
र. रु. १२ कोटी ४३ लाख इतका खर्च येणार आहे. सदरचे बांधकाम ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी नगरसदस्य विकास डोळस, लक्ष्मण उंडे, नगरसदस्या नानी ऊर्फ हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, माजी नगरसदस्य दत्तात्रय गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कुलदिप परांडे यांनी मानले.