नागरवस्ती विभागातील समुह संघटक पदांसाठी उद्या परीक्षा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/6a00d834516d7169e20120a56bc3a2970c-scaled.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या योजनांचे कामकाज हाताळण्यासाठी मानधन तत्वावर समुह संघटक भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची उद्या रविवारी (दि. 7) लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.
पिंपरी-चिंचवडमध्ये रहात असलेल्या सर्व घटकातील नागरिकांच्या हितासाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्याची माहिती वंचित घटकापर्यंत पोचविण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभागाकरिता मानधन तत्वावर 20 समुह संघटकांची पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. त्यासाठी शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याकरिता सामाजिक क्षेत्रातील तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणा-या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. अनेकांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यातील पात्र ठरलेल्या 330 उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी प्रवेशपत्रिका देण्यात आल्या आहेत. या परीक्षा समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या नियंत्रणाखाली होणार आहेत. नागरवस्ती विकास योजना विभागातील अन्य अधिकारी, कर्मचा-यांची वेगवेगळ्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
उद्या सकाळी 9 वाजता महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय, खंडोबा माळ, आकुर्डी चौक याठिकाणी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आदी फोटो आयडी), सॅनिटायझर, मास्कसह सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करत परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन अधिकारी ऐवले यांनी केले आहे.
————–
समुह संघटक पदाच्या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना सकाळी नऊ वाजता परीक्षा केंद्रावर हजर रहाण्याचे कळवले आहे. परीक्षा केंद्रावर कोवीड 19 आपत्तीचा विचार करता सोशल डिस्टंसिंग नियमांचा अवलंब करून उमेदवारांची बैठक व्यवस्था केली आहे. अन्य कर्मचा-यांवर परीक्षेसंबंधीत इतर कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संभाजी ऐवले, समाज विकास अधिकारी, नागरवस्ती विकास योजना विभाग