Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
अटल बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; लष्कराला हा बोगदा ठरणार वरदान

मुंबई | जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या महामार्ग बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. हिमाचल प्रदेशात हा जगातला सर्वात मोठा महामार्ग बोगदा आहे. ज्याचं नाव आहे अटल टनेल. माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांचे नाव या बोगद्याला दिले गेले आहे.

दरम्यान, रोहंताग पासजवळ एक ऐतिहासिक बोगदा बनवण्याची घोषणा स्वत: वाजपेयी यांनी ३ जून २००० साली केली होती. तो आता वाहतुकीसाठी तयार झाला. महत्त्वाचे म्हणजे भारत-चीनदरम्यान ताणलेले संबंध आणि युद्धजन्य स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला हा बोगदा वरदान ठरणार आहे.





