breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरवस्ती विभागातील विविध कल्यणकारी योजनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

पिंपरी –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. सर्व योजनांचा लाभ नागरिकांना घेता यावा, याकरिता अर्ज करण्यास 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये लाभ देण्यासासाठी पालिकेकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2018 पर्यंत होती. तथापि, काही शैक्षणिक योजनांच्या बाबतीत महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रीया अद्यापर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे या योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व कल्याणकारी योजनांचे अर्ज स्वीकारण्यास 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button