नांदेड जिल्ह्यातील बलात्काऱ्याला राज्य सरकार फाशी देणार का? : अमित गोरखे
![Will the state government hang the rapist in Nanded district? : Amit Gorkhe](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Amit-Gorkhe-BJP.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद करवाई करता यावी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देता यावी, यासाठी महाराष्ट्र सरकार शक्ती कायदा अमलात आणला. आंध्र प्रदेशच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर ‘शक्ती’ नावाचे हे दोन कायदे असतील. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेलं हे विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
लगेचच महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात बलात्काराचे प्रकरण घडले. हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र हे विधेयक त्वरित इम्प्लिमेंट करण्याची गरज असून राज्य शासनाने आपली ताकत दाखवण्याची गरज असुन, तात्काळ शक्ती कायदाच्या अंडर नांदेड जिल्ह्यात झालेल्या हत्याकांडातील आरोपीला तत्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.
बलात्काराच्या घटना जर राज्यांमध्ये थांबवायच्या असतील तर शक्ती कायदा हा त्वरित इम्प्लिमेंट करून राज्यातील नांदेडचे हे पहिले प्रकरण आहे.यामुळे राज्य शासनाने त्वरित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व कायदा बळकट करावा, अशी मागणी प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली.