#Coronapatient : देहूरोड येथील नागरिकांनी खबरदारी म्हणून स्वतःहून कॉलनीतील रस्ते केले बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG-20200430-WA0011.jpg)
पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी
देहूरोड भागात नुकतेच कोरोना रुग्ण आढळून आल्याने याचा धसका घेत देहूरोड येथील विकासनगर मधील समर्थ कॉलनीतील नागरिकांनी खबरदारी म्हणून स्वतःहून कॉलनीकडे येणारे सर्व रस्ते काही दिवसांसाठी बंद केले आहेत.
कॉलनीतील जागृत मंडळीच्या सदस्यांनी रहिवाश्यानशी समन्वय साधून एक मताने कॉलनीतील सर्व छोटे – मोठे रस्ते, पायवाट बंद केल्या बऱ्याच दिवसांपासून रहिवाशी भागात अनोळखी लोकांचा वावर दिसत होता तसेच लहान मोठ्या गाड्यांची ये-जा ही होती त्यामुळे खबरदारी म्हणून येणाऱ्या वर मज्जाव करीत सर्व रस्ते बंद केले. रहिवाश्याना सुध्दा बाहेर जाऊ नये तर आवश्यक कारण असेल तरच बाहेर पडा व सहकार्य करा अशी विनंती मंडळाकडून केली आहे. आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यानाच कॉलनी बाहेर पडता येणार आहे. कचरा गाडी, दूध वितरण, गॅस, फळ भाजीपाला इ कॉमर्स सुविधा इत्यादीचे आदण-प्रदान कॉलनीच्या हद्दी बाहेरूनच करण्यात येत आहे. प्रवेश बंदचे फलक ही लावण्यात आले असून प्रत्येकाच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या वरही नजर ठेवली जात आहे.
शासकीय यंत्रणेला सहकार्या बरोबर सुरक्षा आणि खबरदारी घेत लॉकडाउनचे पालन व्हावे व कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे हाच या पाठीमागील प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.