breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
देहुरोडमध्ये भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार
![Two killed in a shooting at a shopping mall in the United States; Four people were injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/1Shoot_1.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार झाला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथे घडली.
विशाल ऊर्फ जिंकी खंडेलवाल असे जखमी नगरसेवकाचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, देहूरोड येथे पंडित नेहरू मंगल कार्यालयासमोर खंडेलवाल यांचे कार्यालय आहे. गुरुवारी सायंकाळी ते कार्यालयात आले. कार्यालयातील कामकाज आटोपून सायंकाळी साडेसातच्या सुमारास कार्यालयाच्या बाहेर पडताना दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली. त्यांना तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. देहूरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.